Queen
Home
व्यक्त अव्यक्तबाळाचे बोबडे बोल सुरू झाले की व्यक्त होण्याची सुरुवात होते. आपल्याला काय हवे आणि काय नको हे बाळाच्या फक्त अर्धवट बोलण्यातून किंवा न बोलण्यातून सुद्धा आईला कळते. ही व्यक्त अव्यक्त ची गोड भाषा आईच्या पोटातच बाळ शिकून घेते. आमच्या वेळी आम्ही व्यक्त होण्यासाठी फक्त बोलत नव्हतो. तर लिहित सुद्धा होतो. एक म्हणजे शुद्धलेखन… यात भाषा शुद्धी बरोबर ती आखीवरेखीव आणि सुंदर कशी दिसेल यावर शाळेत भर दिला जात होता. दुसरा आमचा सोबती निबंध… यात आम्ही आमच्या मनाचे सुंदर मनोरे बांधत होतो. क्षणात आम्ही मुख्यमंत्री होत असू आणि क्षणात करोडपती… त्यावेळेस ना google होते ना Internet…पण आमच्या छोट्याश्या डोक्याला पुस्तकांचे खाद्य भरपूर होते. आपल्या शब्दात…आपल्या वाक्यांची सांगड घालत निबंध तयार होत असत. Search करायची गरजच नव्हती. मनातल्या Network ला भरपूर range असायची. कधी ते उंच डोंगरावर जायचं तर कधी समुद्राच्या खोल तळाशी…तिसरी आमची प्रिय सखी पत्रलेखन…एकमेकांची खुशाली कळण्यासाठी हे एकच माध्यम होते. पत्राच्या मायना वरून समजायचे की…हे पत्र घरातल्या वयाने मोठ्या असणार्या सदस्या साठी आहे. पत्र वाचताना कळायचे की पत्र लिहिणारा माणसाचा mood कसा आहे. इतके मना पासून शब्द पत्रात उतरवलेले असायचे. कधी आनंदाश्रू…तर कधी आठवणीचा उमाळा वाहायचा. पत्र असे एकमेव माध्यम होते ज्याने दूर असणारी नाती जोडलेली होती. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांची खुशाली कळायची. त्या पत्रा मधून सातासमुद्रापार असलेले आपल्यांचे….भरभरून आशिर्वाद आणि व्यक्त अव्यक्त प्रेम मिळायचे. सध्या whatupp आणि mobile मुळे आपण एकमेकांशी सतत connect आहोत. रोज बोलतो , रोज chatting करतो. पण तरीही सहज पणे एकमेकांची मने दुखावतो. पटत असो वा नसो. हवं तसं बोललं की झालं. बेफिकीर अशा या संस्कृतीमध्ये… ना कोणी तीर्थरूप उरले आहेत… ना कोणी प्रिय!आमच्या कडे विचारांची खूप श्रीमंती होती. त्यामुळे बोलताना त्यात गोडवा असायचा. जपून बोलणे, तोलून मापून शब्द वापरणे आणि कुठे fullstop ठेवायचा हे माहीत असायचे. त्यामुळे गोष्टी व्यवस्थित हाताळल्या जात होत्या. आता वाद घालणे खूप सोपे झाले आहे आणि सुसंवाद फारच कमी झालेला आहे. व्यक्त होणे म्हणजे फक्त भडाभडा बोलणे नाही तर विचार पूर्वक बोलणे. आनंद, प्रेम, दुःख, भावना, मत हे व्यक्त करायचे असेल तर मनात असलेल्या भावना शब्दात मांडाव्या लागतात. या भावना अव्यक्त नसाव्यात कारण त्याने आपलीच हानी होते. नात्याचंही तेच आहे. व्यक्त होण्याने प्रेम टिकते, मनातले गैरसमज दूर होतात आणि सामंजस्याने व्यक्त झाले की प्रश्न सुटतात. माणसाने निसर्गाकडून व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. निसर्ग हातचं काही राखून न ठेवता किती भरभरून बोलतो. व्यक्त होतो तो निसर्ग आणि अव्यक्त राहतात ती माणसे!
18th Dec 2025
संयमकाळ्या मातीत स्वतः ला पेरून उगवण्याची वाट पाहणारा शेतकरी म्हणजे संयम….घरातल्या आपल्या माणसांचे राकट बोलणे अगदी सहजपणे पेलणं म्हणजे संयम….उपवास असताना आपल्या आवडत्या पदार्थाकडे न पहाणे म्हणजे संयम….माणसांमधे असा संयमी पणा असेल तर कोणतीही समस्या तो नक्कीच सोडवू शकतो. फक्त ते सोडविण्यासाठी त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. या वेळे मध्ये त्याला अनेक पर्याय सुचू शकतात. ज्याने माणूस आपली समस्या त्याच्या सोयीस्कर पर्यायाने सोडवतो. आणि त्यामुळे त्याला मिळणारा आनंद कायमचा टिकतो. संयमी असणे…हा एक स्वभाव आहे. तो आणावा लागत नाही. तो असावा लागतो. आमची आणि त्याआधीची पिढी ला अनेक ठिकाणी संयम बाळगावा लागला. कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपला संयम ढळू न देता या पिढी ने अनेक आव्हाने पेलली. संयम हा शब्द आणि त्याचा अर्थ सध्याच्या ready to eat आणि fast food च्या जमान्यात मागे पडत चालला आहे. भरधाव वेगाने , कसलीही तमा न बाळगता गाडी चालवणार्या आजच्या generation ला वाट बघायला आवडत नाही. Slow motion मध्ये त्यांना…. प्रमोशन नको आहे. त्यासाठी ते job बदलण्याचा निर्णय घेतात. एकमेकांशी स्पर्धा करण्याची सवय लागल्यामुळे त्यांना लगेच इतरांपेक्षा लवकर श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे आहे. आजकालची ही पिढी जगण्यातली सहजता विसरून गेले आहेत. WiFi बरोबर आपल्या दिवसाची सुरुवात करणार्या आजच्या सगळ्या तरुणांना कोणतीही information अगदी सहज मिळते. रांगेत उभे राहणे त्यांना आवडत नाही. Booking Train, flight, cinema किंवा hotel चे असो… ते online केले जाते. Technology मुळे सगळे सहज…सोपे झाले असले तरी पट्कन गोष्टी available झाल्यामुळे ते जास्त practical होत चालले आहेत. Emotional होणे त्यांना आवडत नाही. संयम आणि सहनशीलता ही कमजोरी नसून ती मनाची खरी ताकद आहे. जी सर्वांकडे नसते. संयम हे एक युद्ध आहे……………… स्वतः विरुद्ध!
18th Dec 2025
प्रेमाला उपमा नाहीप्रेमाची परिभाषा शब्दात मांडता येणार नाही. पण तरीही अनेक थोर महात्मे आणि संतानी आपल्या प्रबोधनाने प्रेमाला जिवंत ठेवले. प्रेमा शिवाय ही पृथ्वी अपूर्ण आहे. असे लोकांना परोपरीने समजावले. प्रेम हा खरं तर किती छोटा शब्द आहे. पण त्यातच सगळं जग सामावलेले आहे. प्रेमा सारखी सुंदर भावना समजण्यासाठी आपल्याला एक जन्मही अपुरा पडेल. शाळेत आम्हाला रोज एक हात पुढे करून आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणावी लागत असे.” माझे माझ्या देशावर प्रेम आहे.” हे वाक्य बोलताना आपोआप मान उंच आणि पाठीचा कणा ताठ होत असे. त्यात असणार्या प्रेमाची छाप अजूनही मनावर कोरली गेली आहे. इंद्रधनुष्या प्रमाणे… प्रेमाचे रंग वेगळे, अर्थ वेगळे….शहर, राष्ट्र, देश…हे प्रेम वेगळे….शाळा, college, शिक्षक…यांचे प्रेम वेगळे…कुटुंबाचे प्रेम आणि मित्र, मैत्रिणी साठी असलेले प्रेम वेगळे…छटा वेगळ्या असल्या तरी आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य एकच आहे.प्रेम हे रंग, रूप हे पाहून होत नाही. ते फक्त एका मनाचे दुसर्या मनाशी जुळणारा बंध आहे. म्हणजे आजकालचे connect होणे …असायला हवे. मान, अपमान, तिरस्कार, राग याला या भावनेत जागा नाही. स्वार्था पलीकडे असणारी भावना आहे ही….यात दुसर्याचा आनंद आणि हित याचा विचार असायला हवा ना!पण आज काल असे होताना दिसत नाही. माणसांबरोबर त्यांचे प्रेम देखील professional झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे पण अनेक गरजा आहेत. हे आजूबाजूला पाहिले की लक्षात येते. माझा आनंद, माझी space, माझा ego असा मीपणा बळावत चाललाय. तुझं ते माझं आणि माझं ते माझंच आहे असा सध्या हिशोब आहे. प्रेम हे आंधळं असतं…. असे असताना सध्या ते मूकं आणि बहिरं सुद्धा झालंय .क्षमा, त्याग, दया, सहनशीलता हे मोठे शब्द फक्त पुस्तकात वाचायला मिळतात. सध्या माणसांशी येणारा यांचा संबंध फार क्वचितच पाहायला मिळतो. माणसाचा जन्मच मुळी प्रेमाच्या उत्कट भावनेतून होतो. आपल्या या जन्माचे सार्थक करायचे असेल तर ऐकायला शिका…. माफ करायला शिका….आनंद द्यायला शिका….सन्मान करायला शिका. थोडसं मी पणा च्या जगातून बाहेर या. आणि आपल्या आयुष्यातले छोटे… छोटे क्षण मनसोक्त जगा. “माझे मन तुझे झाले….तुझे मन माझे झाले” या काव्यात एकदा दोन हृदय एक झाली की बाकी उरते ते फक्त प्रेम 💞मी कशी ओळखू प्रीती…. हे हृदय म्हणू की लेणे प्रेमाला उपमा नाही…. हे देवाघरचे देणे 💞
18th Dec 2025
POSTप्रिय नवरोबा, हे पत्र मी फक्त माझ्या नवर्यास लिहीत नसून … ते समस्त बायकांच्या नवर्यास लिहीत आहे. पत्रास कारण की …….काही नवर्यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी share करायला आवडत नाही. प्रत्येक नात्या साठी त्यांनी….त्यांच्या मनात compartment तयार केलेले असतात. मित्र, आई वडिल, बायको, मुले, घर, office असे सगळे sorted असते. या सगळ्यां बरोबर तुम्ही अगदी loyal असता. त्याचे sharing तुम्ही कोणाशीही करत नाही. आपल्या बायकोशी पण नाही. बायका मात्र …. जे decision घेतील त्यात आपल्या नवर्याला involved करूनच पुढचे पाऊल टाकतात. कारण तुमचा खंबीर support त्यांना हवा असतो. निदान….काही महत्त्वाच्या बाबी आमच्या बरोबर share करायला काय हरकत आहे. अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे का ? असो…कौटुंबिक जबाबदारी बायको हसतमुखाने पार पाडत असते. असे अनेक प्रसंग येतात तिच्या समोर जेव्हा तिला तुमची मदतीची गरज असते. पण तरीही तुम्हाला न सांगता ती एकटीच स्वतः सगळे स्वीकारते. मुलांचे पालन पोषण करत असताना तिचे स्वतः कडे अजिबात लक्ष नसते. मग असे असताना तुम्ही थोडी तिची काळजी घेतली तर बिघडले कुठे???? जेवताना बाळाने शी … सू केली तर फक्त आईला का उठावे लागते. कधी तरी बाबाने… बाळाला स्वच्छ केले तर तिलाही नीट जेवता येईल. आणि तुम्हालाही थोडेसे…आमचे आईपण अनुभवता येईल. असो….Second baby नंतर तर तिची कामामुळे दमछाक होत असते. आरामाची नितांत गरज असूनही ती एकहाती सगळे manage करते. पण जर कधी ती काही kitchen मध्ये काम करत असेल. आणि बाळ रडत असेल तर बाबा सुद्धा अंगाई गीत गाऊन बाळाला गाई…गाई करू शकतात…. कुशीत घेऊन शांत करू शकतात. बाळाला ही आवडेल की….. बाबाने गायलेले अंगाई गीत ऐकायला. पण काही जण या सगळ्या पासून स्वतः ला अलिप्त ठेवतात आणि आपले मनस्वि बापपण miss out करतात. असो….व्यवहारातले बायकांना काय कळते ???? या गैरसमजुती वर विश्वास ठेवणारे अनेक नवरे आहेत. त्यामुळे घरातले अनेक मोठे व्यवहार हे त्यांच्या अपरोक्ष होत असतात. घर खर्चाचे गणित मांडत असताना तिला सतत हिशोबाचे दाखले द्यावे लागतात. नवर्याच्या कष्टांची दखल ही बायको पेक्षा जास्त कोणालाच असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या पैशाचा अपव्यय ती कधीच होऊ देत नाही. उलट तिला घरखर्चा साठी मिळणाऱ्या रक्कमेची संख्या कमी असो की जास्त…..ती आपल्या घराचे व्यवस्थापन नीट सांभाळते. याची पावती तिला कधीच मिळत नाही. हा भाग वेगळा… असो….जिथे प्रेम आहे तिथे भांडण…वाद…रुसवे….फुगवे हे असणारच. तुमच्या ego la सांभाळून आम्हाला….. आमचा स्वाभिमान कधी कधी बाजूला ठेवावा लागतो. घरातली शांती बिघडू नये ही एकमेव काळजी असल्यामुळे आम्हाला सतत कमीपणा घ्यावा लागतो. चार पावले पुढे जाऊन हे efforts कधी तरी आपण ही घ्यावेत असे तुम्हाला का वाटत नाही? हे एक मोठे कोडे आहे. असो….घरातला तुमचा वावर हा… kitchen मध्ये मात्र फार कमी असतो. जरा अधून मधून येत जा. त्याच काय आहे ना!…kitchen मध्ये असणार्या…. अशा अनेक वस्तू आहेत ….ज्यांना तुमचा सहवास , स्पर्श लाभला नाही. तो कधीतरी त्यांना मिळायला हवा ना!… त्यामुळे ते ही आनंदून जातील… आणि थोडी आपापसात ओळख ही होईल. असो….समस्त नवरे मंडळींना माझे एवढेच सांगणे आहे…माणसाच्या आयुष्यात अनेक क्षण येतात. पण लग्न हा असा क्षण आहे. ज्यामुळे एका व्यक्तीला अर्धांगिनी च्या रुपाने पूर्णत्व येतं. दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. पण त्याचा भार फक्त एकावर न पडता….त्याचा balance साधता आला पाहिजे. तुम्ही मनातल्या सगळ्याच गोष्टी share करायला पाहिजे असे काही नाही हो….पण दोघां मधला संवाद हा नात्या पलीकडे जाऊन…मैत्री चा का असू नये. पती आणि पत्नी हे नदीचे दोन काठ असले तरी आपल्या प्रेम आणि विश्वासाचा एक सुंदर brij हा त्या उभयतांनी तयार करायला हवा. संसार हा दोघांचा असतो त्यामुळे एकमेकांवर असणारे जबाबदारीचे ओझे आणि ताण हलका करण्यासाठी….थोडी मदत…थोडी काळजी…थोडासा शब्दाचा आधार हा खूप काही देऊन जातो. आणि पुढचा प्रवास सोपा होवून जातो. असे नाही का वाटत तुम्हाला!नवरा बायकोच्या भांडणात सगळ्यात जास्त जर काही कारणीभूत असेल तर तो म्हणजे पुरुषी अहंकार…नवर्याचे नवरे पण त्याशिवाय अजून पूर्णच होत नाही. आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको म्हणजे पायातील चप्पल….तिला डोक्यावर ठेवत नाही असे सुनावले जाते. ती तुमच्या घरात लक्ष्मी च्या पावलाने येते ना…मग तिला सन्मानाने वागवायला नको का? खरं म्हणजे…ती तुमच्या आयुष्य चा साथीदार आणि सुख दुःखाची वाटेकरी आहे. आपल्या पत्नीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्विकारले तर संसार सुखी आणि आयुष्य आनंदी राहील. बघा…जमत असेल तर!मनात साचलेल्या अनेक विचारांना तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला या पत्राचा आधार घ्यावा लागला. कारण मनातले भाव…. फक्त शब्दाने post करता येतात…..ते forward होत नाही.
18th Dec 2025
कुटुंबवत्सलभिंती खिडक्या दारे नच घर छप्पर सुंदर तेही नच घर माणुसकीचे लावी अत्तर!ते माझे घर! ते माझे घर!श्रीराम आठवले यांची ही कविता खरचं चिंतन करण्यासारखी आहे. प्रत्येकाला हवे असणारे घर हे फक्त चार भिंतीनी नाही तर त्यात राहणार्या माणसांनी बनते. सुरक्षिततेची हमी देणारे भर भक्कम छप्पर आणि त्या आधारावर उभ्या असणार्या दिलासा, उमेद, जिव्हाळा, प्रेम या चार भिंती….त्यांना असणारी मायेची खिडकी आणि सुखाचे दरवाजे म्हणजे घर ! 🏠अशा घरात एकत्र नांदणारे सगळे जण हे आपलं ‘ कुटुंब ‘पोटा पाण्यासाठी धावणारे माणसाचे पाय…दिवसभराची दगदग संपली की जिथे घराच्या ओढीने परततात आणि सुखाने स्थिरावतात. ते आपलं घर! जगाच्या कोपर्यात कुठेही गेलात आणि आलिशान अशा हॉटेल मध्ये राहिलात तरी घरासारखा आसरा फक्त आपल्या माणसांमधे मिळतो. एक कुटुंब आणि अशा अनेक कुटुंब संस्था आपल्या समाज रचनेला मजबूत बनवतात. पूर्वी असणार्या एकत्र कुटुंबात तीन पिढ्या गुण्यागोविंदाने…. एकाच घरात रहात असत. त्यामुळे एका पिढीकडून…. दुसर्या पिढीकडे…संस्कार आणि आचार विचारांची…देवाणघेवाण आपोआप होत असे. आता अनेक ठिकाणी दिसणारी विभक्त कुटुंब पद्धती….ही घरातल्या माणसाच्या सोयीने तयार झाली आहेत आणि तसेही… बदल ही काळाची गरज आहे. या बदलत्या जीवनशैली चा परिणाम आपल्या कुटुंब संस्थेवर होताना दिसतो. घटस्फोटाचे आणि एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. Live in relationship, double income…no kid या मतावर ठाम असणारी couples तशी कमी आहे. तरी पण…तो एक नवा trend आहे. त्यामुळेच की काय….आजच्या पिढीला लग्न, मुलं, कुटुंब, नाती यांचे पाश आणि जबाबदारी नको वाटते. कुटुंब लहान असो की मोठे …. आपल्याला हसावं वाटलं…तर हसण्याची….रडावं वाटलं तर रडण्याची…. आणि चिडावं वाटलं…तर चिडायची….एकमेव हक्काची…व्यक्त होण्याची… ती एक जागा म्हणजे… आपलं ‘कुटुंब ‘असते. कुटुंब हा तसा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जिव्हाळा असला की ते मनाला कुठेतरी भावतं….अशी भावणारी माणसं ही ‘कुटुंबवत्सल ‘ असतात. वात्सल्य हे फक्त स्त्री पुरतं मर्यादीत नसतं. तर कुटुंबा विषयी वत्सलता बाळगणारे पुरुष ही असतात. आजोबा आणि वडिलांनी आपल्या मुला नातवांना दिलेला दम….हा द्यायलाच हवा. घरातलं वातावरण आनंदी राहण्यासाठी…अधनं मधनं असा डोस पाहिजे. आपले घर आणि घरातल्या माणसा विषयी ओढ असणारी….अशी ही कुटुंबवत्सल माणसे असतात. अशी भावबंध जपणारी माणसे सोबतीला असतील तर सुखाचे अनेक सोहळे … उत्साहाने साजरे होतात आणि दुःख ही तितक्याच आवेगाने वाटून घेतले जाते. डोळ्यात गेलेला छोटासा कण काढायला जसा दुसरा कोणीतरी माणूस लागतो. तसेच आयुष्यात आलेले अनेक सुख दुःखाचे क्षण झेलायला माणसे लागतात. स्वतः ची चूक कबूल करण्यासाठी असणारा मनाचा मोठेपणा आणि समोरच्याची चूक उदारपणे माफ करण्यासाठी असणारे मनाचे औदार्य…या दोन्ही गोष्टी तो आणि ती…कुटुंबवत्सल माणसामध्ये आहेत म्हणून आजवर अनेक घराचे घरपण टिकून आहे. तसेही कुणीतरी म्हणून ठेवलंय…घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती 🏠
18th Dec 2025
Next Page
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here:
Cookie Policy
Subscribe
Subscribed
Queen
Sign me up
Already have a WordPress.com account?
Log in now.
Queen
Subscribe
Subscribed
Sign up
Log in
Copy shortlink
Report this content
View post in Reader
Manage subscriptions
Collapse this bar
Design a site like this with WordPress.com
Get started